‘रागिनी एमएमएस-२’ चित्रपटातील ‘बेबी डॉल’ गाण्याला आवाज दिलेल्या कनिका कपूर आणि संगीतकार मीत ब्रदर्स यांचे आगामी ‘रॉय’ चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘चिटीया कलाईंया वे’ असे पंजाबी बोल असलेले हे पेपी गाणे असून त्यावर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस थिरकताना दिसत आहे.
पंजाबी बोल असलेल्या या गाण्याला पाश्चिमात्य संगिताचा मुलामा देण्यात आला असून हे गाणे देखील सुपरहीट होण्यास सज्ज आहे. गाण्यात मीत ब्रदर्ससुद्धा जॅकलिनसोबत ठेका धरताना दिसतात.
‘रॉय’ चित्रपटाची कथा प्रेमाच्या त्रिकोणावर आधारलेली असून यात जॅकलिन दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. जॅकलिनसोबत अभिनेता रणबीर कपूर आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader