बॉलिवूड स्टार सैफ अली खान आणि सोनाक्षी सिन्हा पहिल्यांदाच ‘बुलेट राजा’ चित्रपटामधून पडद्यावर एकत्र येत आहेत. ‘बुलेट राजा’ चित्रपटातील ‘तमंचे पे डिस्को’ हे गाणे सध्या सर्वत्र धुमाकूळ घालणार असेच दिसत आहे.   
‘तमंचे पे डिस्को’ या गाण्याचे चित्रिकरण एका पबमध्ये करण्यात आले असून, सैफ, सोनाक्षी यांनी या गाण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचे म्हटले जात आहे.
सैफने या गाण्याच्या ठेक्यावर ताल धरत त्याच्या शरिराच्या वेगवान हालचाली केल्या आहेत. सोनाक्षीने देखील या ठेकेबाज गाण्यासाठी पूर्ण क्षमतेने नृत्य केले आहे.     
जिमी शेरगील मात्र जास्त त्रास न घेता या दोखांच्या नृत्याचा आनंद लुटताना दिसत आहे.
‘तमंचे पे डिस्को’ या गाण्यातील नृत्य सैफच्या ‘लव आज कल’ चित्रपटातील ‘ट्विस्ट’ आणि सोनाक्षीच्या ‘हिम्मतवाला’ चित्रपटातील गाण्यांमधील नृत्याची आठवण करून देते.  
‘दबंग’ आणि ‘पार्टनर’ या गाजलेल्या चित्रपटांना संगित दिलेल्या साजिद-वाजिद यांनी या गाण्याला संगिताचा साज चढवला आहे.  
इंग्लंड स्थित बँड ‘आरडीबी'(रिदम, ढोल, ब्रास) ने ‘तमंचे पे डिस्को’ या गाण्यामधून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले आहे.  
‘आरडीबी’चे डान्सर देखील ‘तमंचे पे डिस्को’ गाण्यावर थिरकले आहेत. या आधी ‘ओम मंगलम’ आणि ‘यमला पागल दिवाना’ या गाण्यांमधून ‘आरडीबी’ने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. मात्र, सैफ सोबत ‘आरडीबी’ प्रथमच काम करत आहे.    
सैफ, सोनाक्षी आणि जिमी शेरगील यांच्या व्यतिरीक्त विद्युत जामवाला, गुलशन ग्रोव्हर आणि भोजपूरी चित्रपटांचा अभिनेता रवी किशन ‘बुलेट राजा’ चित्रपटामधून दिसणार आहेत.
तिग्मांशू धुलियाचे दिग्दर्शन असलेला ‘बुलेट राजा’ चित्रपट २९ नोव्हेंबरला चित्रपटगृहामध्ये झळकणार आहे.
पहा संपूर्ण गाणे:

Story img Loader