सैफ अली खानचा अभिनय असलेल्या तिग्मांशु धूलियाच्या ‘बुलेट राजा’ चित्रपटाच्या शीर्षक गाण्याचा व्हिडिओ प्रसिध्द करण्यात आला आहे. संगित आणि गीत यांच्या कसोटीवर सामान्य असलेल्या या गाण्यात ‘राज मिश्रा’ उर्फ ‘बुलेट राजा’ या सैफ अली खानच्या पात्राविषयी अत्यंत भडक बोलीत सादरीकरण करण्यात आले आहे.
गाण्यात सैफच्या पात्राचे ‘युपी के भैय्या’ – ‘बाहुबली’ जो समाजातील योग्य गष्टींच्या पाठीशी आपल्या सहकाऱ्यांसमवेत उभा राहतो असे वर्णन करण्यात आले आहे. या कामात त्याला जिमी शेरगीलची साथ देखील दाखवीण्यात आली आहे. ‘इस थंड में गरमी बढाने आ रहे हैं… बुलेट राजा’ गाण्याच्या या शीर्षकाप्रमाणे ‘बुलेट राजा’ कीक मारून बाईक सुरू करून, गुलशन ग्रोव्हर, विद्युत जामवाल आणि भोजपुरी अभिनेता रवी किशन या खलनायकांचा चांगला समाचार घेतांना गाण्यात दखविले आहे.
अभिनेत्री बनण्याच्या प्रयत्नात असलेल्या सोनाक्षी सिन्हाबरोबरचा सैफचा रोमान्सदेखील गाण्यात डोकावून जातो.
चित्रपटाचे संगित साजिद-वाजिदचे असून, गीत कौशर मुनीरचे आहे. बुलेट राजा हे शीर्षक गीत वाजित अली आणि किर्ती सगाथीयाने गायले आहे.
या अधी प्रसिध्द झालेल्या चित्रपटातील ‘तमनचे पे डिस्को’ या गाण्याप्रमाणेच हे नवीन गाणे देखील लवकरच विस्मरणात जाईल. पश्चिम बंगालचे अंडरवर्ल्ड आणि तेथील माफियांवर आधारीत हा चित्रपट २९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

Story img Loader