अभिनेता सैफ अली खान, राधिका आपटे, चित्रांगदा सिंग अशी नवी केमिस्ट्री ‘बाजार’ या चित्रपटातून लवकरच पाहायला मिळणार आहे. सैफच्या नव्या चित्रपटाचा पहिला ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘बडा आदमी बनना है तो लाइन क्रॉस करनी होगी’ म्हणणाऱ्या शकुन कोठारी या व्यावसायिकाची कथा “बाजार’मध्ये पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अडीच मिनिटांचा पहिला ट्रेलर आणि त्यातील सैफचे डायलॉग चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात आणखी कुतूहल निर्माण करत आहे. या चित्रपटातून रोहन मेहरा हा नवा चेहराही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘सेर्केड गेम्स’नंतर राधिका आणि सैफ पुन्हा एकदा या चित्रटाच्या निमित्तानं एकत्र दिसणार आहे.

केवळ पैसा कमावण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या एका स्वार्थी व्यावसायिकाची भूमिका सैफ साकारताना दिसत आहे. त्यामुळे ‘बाजार’चा ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता अनेकांना आहे. २६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.