साजिद खान दिग्दर्शित ‘हमशकल्स’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. यात सैफ अली खान, बिपाशा बसू, रितेश देशमुख, ईशा गुप्ता, तमन्ना भाटिया आणि राम कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
‘हमशकल्स’पूर्वी साजिद खानने ‘हिम्मतवाला’, ‘हाउसफूल’, ‘हाउसफूल २’, ‘हे बेबी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याच्या मागील चित्रपटांपेक्षा हा चित्रपट हटके असल्याचे साजिदचे म्हणणे आहे. सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर याच तिहेरी भूमिकेत असल्यामुळे यात नऊपट मस्ती असल्याचे तो म्हणतो. वाशू भगनानी निर्मित हमशकल्स २० जूनला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader