‘फँन्ड्री’च्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळेचा ‘सैराट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एस्सेल व्हिजन आणि आटपाटची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा दुसरा टीझर रविवारी प्रदर्शित करण्यात आला.
‘फॅन्ड्री’ला मिळालेल्या यशानंतर नागराज मंजुळेचा ‘सैराट’ कसा असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. टिझर पाहिल्यावर ही उत्सुकता आणखीच शिगेला जाते. या टीझरमध्ये एका किल्ल्यात हातात हात घेऊन बसलेले प्रेमी युगुल पाहावयास मिळते. विविध रंगानी रंगलेला चित्रपटाच्या शीर्षकाचा लोगो विशेष लक्ष खेचून घेतो. ‘सैराट’ ही एक प्रेमकथा असून त्याचा केंद्रबिंदू एक समर्पित तरुणी आहे.
पुढच्या वर्षी प्रदर्शित होणा-या सैराट चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन अजय-अतुल या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीने केले आहे.

Story img Loader