‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत राहिला आहे. त्यातूनचं दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाचा टीजर आणि प्रोमो गाणे प्रदर्शित करून सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. सैराट चित्रपटातील ‘याडं लागलं ग याडं लागलं गं’ या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
या गाण्यातून पहिल्यांदाच चित्रपटातील मुख्य कलाकारांचे चेहरे पाहावयास मिळत आहेत. नुकताच वयात आलेला नायक प्रेमात पडल्यामुळे त्याची अवस्था वेडावणारी आहे. नागराज यांनी चित्रपटातील गाणे फेसबुकवर पोस्ट केले असून त्याचे बोलही टाकले आहेत.
“याडं लागलं ग याडं लागलं गं
रंगलं तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं
चांद भासतो दिसाच मावळाया लागलं
आस लागली मनात कालवाया लागलं गं
याडं लागलं ग याडं लागलं गं…”
अजय-अतुल या संगीतकार जोडीने सैराटचे संगीत दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे सैराटमधील गाणी भन्नाट असतील याबद्दल काही शंका नाही.