बॉलीवूडचा ‘दबंग’ सलमान खान आणि ‘खिलाडी’ अक्षय कुमार पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. आगामी ‘फग्ली’ या चित्रपटातील ‘ये फग्ली फग्ली क्या है’ या हनी सिंगच्या गाण्यावर ते थिरकले आहेत.
या गाण्यात यो यो हनी सिंग फॅक्टर असल्यामुळे हे नक्कीच तरुणाईत प्रसिद्ध होईल असे गाणे आहे. फग्ली या गाण्याचे लेखन, संगीत आणि गायन हे हनी सिंगनेच केले आहे. सदर गाण्याच्या व्हिडिओत सलमान आणि अक्षय गाण्याच्या बिट्सवर नाचताना दिसतात. या दोघांनी आधी ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘जान-ए-मन’ या चित्रपटातून आपल्या जोडीची जादू दाखविलेली आहे. तसेच, अक्षयच्या ‘तिस मार खा’ चित्रपटातीलही एक गाण्यात सलमान कतरिनासोबत थिरकताना दिसला होता.
कबिर सदानंद दिग्दर्शित ‘फग्ली’ चित्रपटात जिमी शेरगीलसोबत नवोदित कलाकार मोहित मारवाह, किआरा अडवाणी, ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता विजेंदर सिंग यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट १३ जूनला प्रदर्शित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा