‘धूम ३’ नंतर चर्चा आहे ती सलमान खानच्या आगामी ‘जय हो’ चित्रपटाची. ‘जय हो’च्या पोस्टरला प्रेक्षकांची आणि सलमानच्या चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे. तुम्ही जर सलमानचे मोठे चाहते असाल तर ‘जय हो’ मधील ‘तेरे नैना मार ही डालेंगे’ गाणे बघणे तुम्हाला चुकवून कसे चालेल.
सलमान आणि रोमानियन अभिनेत्री डेसी शाहवर चित्रीत करण्यात आलेले हे रोमॅण्टिक गाणे शान आणि श्रेया घोशालने गायले आहे. हे गाणे ‘दबंग’ चित्रपटातील ‘तेरे मस्त मस्त दो नैन’ ची आठवण करून देते. डेसीने यात शिफॉनच्या साड्या परिधान केल्या असून, त्यामुळे यश चोप्रांच्या चित्रपटातील अभिनेत्रींची आठवण आल्यावाचून राहत नाही.
‘स्टॅलिन’ या तेलगू चित्रपटाचा ‘जय हो’ हा रिमेक आहे. तब्बू, सना खान आणि डेसी शाह यांच्या भूमिका असलेला आणि सोहेल खान दिग्दर्शित ‘जय हो’ २४ जानेवारी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader