‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकणारी शाहरूख खान आणि दीपिका पदुकोणची जोडी ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘मनवा लागे’ हे रोमँटिक गाणे प्रदर्शित करण्यात आले. शाहरूख खानचे एट पॅक अॅब्स या गाण्यातील मुख्य आकर्षण आहे. यापूर्वी फराह खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील ‘दर्द-ए-डिस्को’ या खास गाण्यात शाहरूख खानच्या एट पॅक अॅब्सचे दर्शन घडले होते, सात वर्षानंतर खास तिच्यासाठी पुन्हा त्याने हा जादुई करिश्मा साकारला आहे. तर, दुसरीकडे दीपिकाने या गाण्यात आपल्या शास्त्रीय नृत्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे. विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केलेले ‘मनवा लागे’ हे गाणे श्रेया घोषाल आणि अरजित सिंग यांनी गायले आहे.

Story img Loader