चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष्य वेधल्यानंतर ‘हैदर’च्या निर्मात्यांनी त्याचा ट्रेलरही लॉन्च केला आहे. चॉकलेट बॉयची इमेज असलेला शाहीदचा एक वेगळा लूक यात पाहावयास मिळतो.
अशांत आणि बर्फाळ वातावरण असलेल्या काश्मीरमध्ये ‘हैदर’चे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शांत आणि गंभीर अशी शाहिदची दोन्ही रुप पाहावयास मिळतात. आपल्या आयुष्यातील ही सर्वाधिक आव्हानात्मक भूमिका आहे असे म्हणणा-या शाहिदने केवळ शरिरसौष्ठवात बदल केला नाही तर भूमिकेत संपूर्णपणे उतरण्यासाठी त्याने भावनिकदृष्ट्याही स्वतःला त्यात झोकून दिले. हा चित्रपट व्हिल्मिअम शेक्सपिअरच्या ‘हेम्लेट’ कादंबरीवर आधारित आहे. विशाल भारव्दाज, सिध्दार्थ रॉय कपूर आणि शाहिद कपूरने निर्मित केले आहे. स्वत: विशालने चित्रपटा संगीतही दिले आहे. शाहिर आणि श्रध्दाव्यतिरिक्त तब्बू, के के मेनन आणि इरफान खानसुध्दा यांच्या ‘हैदर’मध्ये प्रमुख भूमिका असून २ ऑक्टोबर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Story img Loader