‘ये आवाज तो कुत्ते के मुह पर भी अच्छी लगेगी’, दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांच्या या वाक्यात ‘शमिताभ’ या चित्रपटाचे संपूर्ण सार दडले आहे. ‘शमिताभ’ या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यानंतर प्रेक्षकांची उत्कंठा आणखी शिगेला पोहचली आहे. अमिताभ आणि धनुष यांनी चित्रपटात साकारलेल्या पात्रांचा अहंकार आणि दोन व्यक्तिमत्वांमधील संघर्षाचे प्रभावी चित्रण या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. याशिवाय, ट्रेलर पाहिल्यानंतर अक्षरा हसनच्या भूमिकेबद्दलही उत्सुकता निर्माण झाली आहे. आर. बाल्की दिग्दर्शित ‘शमिताभ’ येत्या ६ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

Story img Loader