सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय कुमार यांच्या आगामी ‘बॉस’ चित्रपटातील ‘हर किसी को नही मिलता यहा प्यार जिंदगी मे’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातून सोनाक्षी सिन्हा बॉलीवूडची एके काळची आघाडीची अभिनेत्री श्रीदेवीची आठवण करून देते. लाल आणि पांढ-या साडीतली सोनाक्षी ही बॉस म्हणजेच अक्षय कुमारसोबत नृत्य करताना दिसते. तसेच, अक्षय कुमार हा काउबॉय स्टायलमध्ये दिसतो. हे गाणे अरिजीत सिंग आणि नीती मोहन यांनी गायले असून चिरंतन भट्ट याने गाण्यास संगीत दिले आहे.

१९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘जांबाझ’ या चित्रपटात फिरोझ खान यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले होते.

हेच गाणे अदिती हैद्री आणि शिव पंडित यांच्यावरही चित्रीत करण्यात आले असून, हॉट अवतारातली अदिती ही शिव पंडित याच्यासोबत रोमान्स करताना दिसते. रॉनित रॉय, मिथुन चक्रवर्ती, डॅनी डेन्गोन्झा, जॉनी लिव्हर आणि परिक्षित साहनी यांच्याही भूमिका असलेला ‘बॉस’ १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.