सोनम कपूर आणि आयुष्यमान खुराना सध्या पार्टीच्या मूडमध्ये असणार. कारण त्यांच्या आगामी ‘बेवकुफिया’ चित्रपटातील ‘गुलछरे’ गाण्याने तरुणाईला त्यावर थिरकण्यास भाग पाडले आहे.
‘गुलछरे’ हे बिनधास्त, मस्तीवाले गाणे असून तरुणाईत ते प्रसिद्ध झाले आहे. गाण्यात सोनम-आयुषमान हे त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर राजस्थानला सुट्टी साजरी करण्यासाठी गेलेले दाखवले आहेत. यात ते क्लब आणि राफ्टिंगचा आनंद घेताना आणि मजा-मस्ती करताना दिसतात. याच गाण्यात सोनम कपूर ही बिकनीमध्ये दिसते.
एकमेकांवर वेड्यासारखे प्रेम करणा-या प्रेमीयुगुलाची सोनम आणि आयुष्यमानने भूमिका केली आहे. या विनोदी चित्रपटात ऋषी कपूर हे सोनमच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. नुपूर अस्थाना दिग्दर्शित ‘बेवकुफिया’ १४ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2014 रोजी प्रकाशित
पाहाः सोनम-आयुषमानचे ‘गुलछरे’
सोनम कपूर आणि आयुष्यमान खुराना सध्या पार्टीच्या मूडमध्ये असणार.
First published on: 17-02-2014 at 12:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch sonam kapoor ayushmann khurranas gulcharrey in bewakoofiyaan