बॉलीवूड स्टाइल दीवा सोनम कपूर आणि फवाद खान ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. मात्र, यावेळी हे दोघे कोणत्याही चित्रपटात नसून एका पाकिस्तानी जाहिरातीत एकत्र झळकले.
‘तरंग’ या पाकिस्तानी चहा कंपनीची ही जाहिरात असून यात सोनम आणि फवाद हे सिन्ड्रेला आणि राजकुमारच्या भूमिकेत दिसतात. या दोघांनी २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘खुबसूरत’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘नीरजा’ या चित्रपटासाठी सोनमची सर्व स्तरातून प्रशंसा केली जात असून फवाद खान लवकरच ‘कपूर अॅण्ड सन्स’ या चित्रपटात झळकेल.
व्हिडिओः पाकिस्तानी जाहिरातीत सोनम कपूर आणि फवाद खान
तरंग' या पाकिस्तानी चहा कंपनीची ही जाहिरात आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
First published on: 22-02-2016 at 10:15 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch sonam kapoor in pakistani ad with fawad khan