बॉलीवूड स्टाइल दीवा सोनम कपूर आणि फवाद खान ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. मात्र, यावेळी हे दोघे कोणत्याही चित्रपटात नसून एका पाकिस्तानी जाहिरातीत एकत्र झळकले.
‘तरंग’ या पाकिस्तानी चहा कंपनीची ही जाहिरात असून यात सोनम आणि फवाद हे सिन्ड्रेला आणि राजकुमारच्या भूमिकेत दिसतात. या दोघांनी २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘खुबसूरत’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘नीरजा’ या चित्रपटासाठी सोनमची सर्व स्तरातून प्रशंसा केली जात असून फवाद खान लवकरच ‘कपूर अॅण्ड सन्स’ या चित्रपटात झळकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा