प्रेक्षकांवर चित्रपटाच्या दमदार ट्रेलर आणि पोस्टरची मोहिनी पाडल्यानंतर फराह खान दिग्दर्शित ‘हॅपी न्यू इयर’ या बदुचर्चित चित्रपटातील ‘इंडियावाले’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.
चित्रपटात जितकी तगडी स्टारकास्ट आहे तितक्याच भव्यतेने हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. ‘इंडियावाले’ हे डान्स साँग असून या गाण्यावर शाहरुख, दीपिका, बोमन इरानी, अभिषेक बच्चन, सोनु सूद आणि विवान शहा यांनी ठेका धरला आहे. इंडियावाले हे गाणे विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केले असून विशाल दादलानी, केके, शंकर महादेवन आणि निती मोहन यांनी गायले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा