एकता कपूरच्या २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘रागिनी एमएमएस’चा सिक्वल येत्या २१ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. अॅडल्ट चित्रपटात काम कराणारी सनी लिओनीची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.
चित्तथरारक कथानकाची पार्श्वभूमी असलेल्या रागिनी एमएमएसचा सिक्वलही तितकाच रोमांचक आणि अंगावर काटा उमटवणारी कथा रागिनी एमएमएस २ ची असेल. त्यात सनी लिओनी मुख्यभूमिकेत आहे म्हणजे, तितकेच बोल्ड सिन्सही चित्रपटात असणार यात काही शंकाच नाही आणि या ट्रेलरमधूनही ते जाणवते. परंतु, यावेळी सनी लिओनीने मर्यादा ओलांडून बोल्ड सिन्स रागिनी एमएमएस २ साठी केले असल्याची चर्चा आहे.

तसेच रागिनी एमएमएस २ चे कथानक १९९९ साली प्रदर्शित झालेल्या द ब्लेक विट्च प्रोजेक्ट या हॉलीवूड चित्रपटाच्या कथानकाशी मिळतीजुळते असल्याचेही म्हटले जात आहे.
या ट्रेलरमध्ये सनी लिओनीचे बोल्ड सिन्स तर दिसतातच पण, यावेळी सनि लिओनीचे अभिनयाचे कसब उत्तमरित्या पडद्यावर उत्तमरित्या सादर करता यावा यावरही खास लक्ष दिले गेले आहे. या चित्रपटात सनी लिओनिसोबत दिव्या दत्ता, प्रविण दाबस, संध्या मिरदूल, सोनिया मेहरा आणि अनिता हसननंदानी हे देखील आहेत.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch sunny leone bares it all in the spooky trailer of ragini mms 2%e2%80%b2