राकेश रोशनच्या ‘क्रिश-३’ या आगामी चित्रपटातील नुकत्याच प्रसिध्द करण्यात आलेल्या ‘दिल तु ही बता’ या गाण्याच्या व्हिडिओमध्ये सुपरहिरो हृतिक रोशन कंगना राणावतसोबत रोमान्स करतांना दिसतो. या हळुवार सुमधुर गाण्याची निर्मिती राजेश रोशन यांची असून, सदर गाणे हृतिकच्या पहिल्या चित्रपटातील ‘कहो ना… प्यार है’ या गाण्याची आठवण करून देते.
जॉर्डनमधील पेट्रा येथील नयनरंम्य स्थळांच्या पार्श्वभूमिवर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यात कंगना अतिशय सुंदर दिसते. या चित्रपटात हृतिक सुपरहिरोची भूमिका करत असून कंगना ‘काया’ या उत्परिवर्तीत स्त्रीची व्यक्तिरेखा करत आहे.
क्रिश-३मध्ये प्रियांका चोप्रा, विवेक ऑबेरॉय आणि रेखा यांच्यासुध्दा भूमिका आहेत. हा चित्रपट दिवाळीत ३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा