प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांमध्ये हिट झालेल्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता या चित्रपटातील ‘तेरे मेरे बीच मै’ या गाण्याचा व्हिडीओदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे. जयदीप सहानी लिखित या गाण्यास सचिन-जिगर यांनी संगीत दिले असून सुनीधी चौहान आणि मोहित चौहान यांनी हे गाणे गायले आहे.
आधुनिक प्रेमकथा असलेल्या या चित्रपटात प्रेम आणि बांधिलकीऐवजी प्रेमानंतर येणारा शुद्ध देसी रोमान्स दाखविला आहे. यात लिव्ह इन रिलेशनशीप आणि त्यानंतर येणा-या अडचणी पाहायला मिळणार आहेत. जयदीप साहनी यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्माचे असून या चित्रपटाचा निर्माता आदित्य चोप्रा आहे. रोमॅण्टिक कॉमेडी असलेला ‘शुद्ध देसी रोमान्स’ हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

Story img Loader