यश राज फिल्म्सचा आगामी चित्रपट ‘शुद्ध देसी रोमान्स’मधील प्रेमाचे रंग दर्शविणारे ‘गुलाबी’ गाणे प्रदर्शित झाले आहे. १ ऑगस्टला या गाण्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी गाण्याच्या शीर्षकाप्रमाणे सुशांत सिंग राजपूत आणि वाणीने गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले होते. ऐतिहासिक हवा महल आणि अमेर किल्ला येथे चित्रपटातील मुख्य कलाकार सुशांत सिंग राजपूत आणि वाणी कपूर यांच्यातील प्रणयदृश्ये चित्रित करण्यात आली आहेत. गाण्यामध्ये राजस्थानी भाषेचाही वापर करण्यात आला आहे. गुलाबी गाण्यास सचिन-जिगरने संगीतबद्ध केले असून, जिगर आणि प्रिया सरैय्या यांनी हे गाणे गायले आहे.
चित्रपटातील सुशांत आणि वाणीमधील चुंबन दृश्यामुळे सुशांत व त्याची प्रेयसी अंकिता लोखंडे यांच्यामध्ये तणाव असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, सुशांतने यास नाकारले असून दोघांमधील संबंध पूर्ववत असल्याचे सांगितले आहे. सुशांत म्हणाला की, आमच्या दोघांमध्ये चित्रपटातील चुंबन दृश्यावरून कोणताही वाद नाही. ती स्वतः एक अभिनेत्री असल्यामुळे हा माझ्या कामाचाच एक भाग असल्याचे तिला माहित आहे. अंकिता लोखंडे झी वाहिनीवरील पवित्र रिश्ता मालिकेतील मुख्य भूमिका साकारत आहेत.
मनिष शर्मा दिग्दर्शित शुद्ध देसी रोमान्स या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे.
पाहाः सुशांत सिंग आणि वाणीचा ‘गुलाबी’ रोमान्स
यश राज फिल्म्सचा आगामी चित्रपट 'शुद्ध देसी रोमान्स'मधील प्रेमाचे रंग दर्शविणारे 'गुलाबी' गाणे प्रदर्शित झाले आहे.
First published on: 02-08-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch sushant singh rajput vaani kapoor spread gulabi rang in shuddh desi romance