२० मे रोजी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या जीवनावर आधारित ‘अझर’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रकाशित झाला होता. यावेळी अझरने हा चित्रपट माझा देव, माझे लग्न आणि मॅच फिक्सींग यावर आधारित असल्याचे सांगितले होते. आज २५ मे रोजी प्रकाशित करण्यात आलेला चित्रपटाचा टिझर याच गोष्टी अधोरेखीत करताना दिसतो.
टिझरमध्ये अझरची भूमिका साकारणारा इमराम हाश्मी अझरच्या वेशात मैदानाकडे जाताना दाखविण्यात आला आहे. त्याचवेळी मै तीन चीजो के लीये फेमस् हू एक, मै खुदा को मानता हूं, दो शादी हुई हे मेरी (याच वेळी एक मुलगी ‘marry me ‘ असा बॅनर त्याच्याकडे झळकावताना दाखविण्यात आली आहे.) और मॅच फिक्स करने का इलझाम मुझपे है असा डायलॉग या दृष्यांना जोडण्यात आला आहे. हे दृष्य सुरु असतानाच पुढे त्याच्यावर हल्ला होतानाचे दृष्ट दाखवून अझरची मॅचफिक्सींगच्या आरोपांमुळे झालेली स्थिती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
COLLAR UP !!! teaser of AZHAR !! https://t.co/NNO2uUBH09
— emraan hashmi (@emraanhashmi) May 25, 2015
या टिझरच्या मागे असलेला इमरान हाश्मीचा आवाज अझरच्या व्यक्तीरेखेमधील तळमळता अधोरेखीत करतो. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार अभिनेत्री प्राची देसाई अझरच्या पहिल्या पत्नीची तर संगीता बिजलानी दुस-या पत्नीची भूमिका साकारताना दिसेल. २००२ मध्ये मॅचफिक्सींग प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप अझरुद्दीन वर ठेवण्यात आला होता. यानंतर भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने त्याच्यावर आजीवन बंदी घातली होती. त्यानंतर आंध्रप्रदेश उच्चन्यायालयाने ही बंदी रद्द केली होती.