‘शोले’ या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत नवे मापदंड निर्माण केले, त्याचप्रमाणे या चित्रपटातील व्यक्तिरेखाही अजराअमर झाल्या. विशेषत: अमजद खान यांनी साकारलेला गब्बरसिंग हा खलनायक आजही चित्रपट रसिकांच्या स्मरणात आहे. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘गब्बर इज बॅक’ या चित्रपटातही ‘शोले’ची काहीशी झलक पहायला मिळते.
‘पचास पचास कोस दूर जब लोक… वरना गब्बर आ जाएँगा हे’ गब्बरच्या तोंडी असलेले वाक्य तेव्हा आणि आजही फार लोकप्रिय आहे. ‘गब्बर इज बॅक’मध्येही अक्षय कुमारच्या तोंडी हे वाक्य आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून, सुरूवातीलाच अक्षय कुमारच्या आवाजातील, ‘ पचास पचास कोस दूर जब लोग… रिश्वत लेते है तो कहते हे की मत ले वरना गब्बर आ जाएँगा’ हे वाक्य ऐकायला मिळते. चित्रपटातील हा गब्बर भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देताना दिसणार असल्याचे अक्षयने ट्विटरवरून सांगितले. अक्षय कुमारशिवाय या चित्रपटात श्रुती हसन आणि प्रकाश राज यांच्या भूमिका असणार आहेत. येत्या १ मेपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा