पॉर्न स्टार आणि बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी ‘हेट स्टोरी २’च्या ‘पिंक लिप्स’ टीझरमधून नव्या अवतारात आली आहे.
या टीझरमध्ये सनी मादक रुपात आपले गुलाबी ओठ दाखविताना दिसते. विक्रम भटच्या आगामी ‘हेट स्टोरी २’ चित्रपटातील हे खास गाणे आहे. या चित्रपटाद्वारे टीव्ही कलाकार जय भानुशाली आणि सुरवीन चावला बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला यू ट्यूबवर २० लाखांच्या आसपास हिट्स मिळाल्यामुळे तो याआधीच चर्चेचा विषय बनला होता. त्यातून आता सनीच्या गाण्यामुळे तर यास अजूनच रंगत मिळाली आहे. हे गाणे मीट ब्रदर्स अंजनने संगीतबद्ध केले आहे. अंजनने यापूर्वी रागिनी एमएमएस २ मधील बेबी डॉल या गाण्यात सनीसोबत काम केले होते. सनीच्या या गाण्याचा चित्रपटाच्या प्रसिद्धीत नक्कीच फायदा होईल असा विश्वास दिग्दर्शक विशाल पांड्या याने दर्शविला.
२०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘हेट स्टोरी’ चित्रपटाचा हा सिक्वल आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jun 2014 रोजी प्रकाशित
पाहाः सनी लिओनीचे ‘पिंक लिप्स’
पॉर्न स्टार आणि बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी 'हेट स्टोरी २'च्या 'पिंक लिप्स' टीझरमधून नव्या अवतारात आली आहे.
First published on: 30-06-2014 at 02:14 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch teaser sunny leone seduces with her pink lips