अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण काल (बुधवारी) विवाहबंधनात अडकले. दीप-वीर लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर संपूर्ण देशाला त्यांच्या लग्नाच्या फोटोंची प्रतीक्षा आहे. रणवीर- दीपिकाने अद्याप सोशल मीडियावर एकही फोटो पोस्ट न केल्याने चाहत्यांचीही निराशा झाली आहे. या बहुचर्चित लग्नाचे अधिकृत फोटो जरी अद्याप सोशल मीडियावर आले नसले तरी त्या प्रतीक्षेत असलेल्या नेटकऱ्यांचे भन्नाट मीम्स मात्र तुफान व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले मीम्स-

नवविवाहित जोडप्याला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. ही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मात्र लवकरच चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. कारण सिंधी पद्धतीनं विवाह पार पडल्यानंतर या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणार आहेत. प्रसिद्ध छायाचित्रकार विशाल पंजाबी रणवीर दीपिकाच्या आयुष्यातील खास क्षण टिपणार आहे. संध्याकाळच्या सुमारास लग्नाच्या साऱ्या विधी आटोपल्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणार असल्याचं समजत आहे.