बी टाऊनमध्ये कलाकार पडद्यावर कोणतीही भूमिका साकारण्यासाठी जितक्या गांभिर्याने काम करतात तेच हे कलाकार पडद्यामागे तितकीच मज्जा आणि धम्माल मस्तीही करतात. अशाच काही खट्याळ अभिनेत्यांमधील तरुणाईचा लाडका अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. बॉलिवूडचा हा बाजीराव त्याच्या भूमिकांना चोखंदळपणे बजावतोच पण, तो ऑफस्क्रिन त्याच्या सहकलाकारांसोबत अगदी अमर्याद कल्लाही करतो. रणवीर सिंग आणि त्याच्या मजा-मस्तीचे किस्से आता काही नवीन नाहीत. पण, त्याच्या या किस्स्यांमध्ये नाविन्य आहे हे मात्र नाकारता येणार नाही. रणवीरने नकताच त्याच्या इस्न्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो फराह खानसोबत धम्माल करताना दिसतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नृत्यदिग्दर्शिका फराह खानला तिच्याच अंदाजात म्हणजेच नाचण्यातच आव्हान देत रणवीर या व्हिडिओमध्ये शिरकताना दिसतोय. ८० च्या दशकात गाजलेल्या ‘खून भरी मांग’ या चित्रपटातील एका गाण्यावर रणवीर नाचताना दिसत आहे. फराह आणि रणवीरचा हा हटके डान्स सुरु असतानाच फराह अचानकच रणवीरला स्विमिंग पूरमध्ये मागच्या मागे ढकलून देत आहे. त्यामुळे या दोन्ही कलाकारांची ही धम्माल पाहताना आपल्यालाही हसू आवरणार नाही. एका जाहिरातीच्या सेटवर फराह आणि रणवीरचा हा कल्ला पाहायला मिळाला आहे.

अभिनेता रणवीर सिंगने फार कमी वेळातच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. सध्या रणवीर संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये तो अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत झळकणार असून तो या भूमिकेसाठी सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. रणवीरसोबतच या चित्रपटामध्ये अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणसुद्धा स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये काही दिवसांपू्वी अनेक अडचणी आल्या होत्या हे जरी खरे असले तरीही पुन्हा एकदा चित्रपटाची तयारी पुर्ववत आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात रणवीरचा हा तिसरा चित्रपट असून यायाधी त्याने भन्साळींच्या ‘राम-लीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांमध्ये काम केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch this rendition of khoon bhari maang by ranveer singh and farah khan