आगामी ‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटातून गुन्हेगारीशी लढण्यासाठी बॉलीवूडचा दमदार पोलीस बाजीराव सिंघम सज्ज झाला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
अॅक्शनपटांच्या चाहत्यांसाठी ‘सिघट रिटर्न्स’ हा एक पर्वणीच ठरणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सिंघम म्हणजेच अजय देवगण गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचा अंत करण्यासाठी लढताना दिसतो. सिंघमच्या प्रेयसीची भूमिका करणारी करिना काही विनोदी दृश्यांमध्ये दिसते. खूप चांगले मित्र असलेल्या रोहित शेट्टी आणि अजय देवगणने यापूर्वी सिंघम, बोल बच्चन आणि गोलमाल यांसारखे यशस्वी चित्रपट एकत्र केले आहेत. जेव्हा साहसीदृश्यांची वेळ येते तेव्हा फार कमी हिरो आहेत जे अजय देवगणइतकं चांगलं काम करू शकतात. त्यातून ट्रेलरमध्ये जर तुम्ही अजयचे मसल्स पाहिले तर तुम्हाला नक्कीच कळेल की तो साहसीदृश्यांसाठी का उपयुक्त आहे ते. येत्या १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jul 2014 रोजी प्रकाशित
पाहाः अजय देवगणच्या ‘सिंघम रिटर्न्स’चा ट्रेलर
आगामी 'सिंघम रिटर्न्स' चित्रपटातून गुन्हेगारीशी लढण्यासाठी बॉलीवूडचा दमदार पोलीस बाजीराव सिंघम सज्ज झाला आहे.

First published on: 11-07-2014 at 04:31 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch trailer ajay devgn is back in singham returns