बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी इट्स एन्टरटेन्मेंट चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
चित्रपटाच्या या पहिल्याच ट्रेलरमध्ये, अक्षय कुमार करोडो रुपयांसाठी एका कुत्र्याशी संघर्ष करताना दिसतो. या कुत्र्याचे नाव एन्टरटेन्मेंट असे आहे. एक कुत्रा जो माणसाचे आयुष्य जगतो आणि एक माणूस जो कुत्र्याचे आयुष्य जगतो, अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. अक्षय हा लक्षाधीश बापाचा मुलगा दाखवला असून त्याच्या वडिलांनी सर्व संपत्ती एका कुत्र्याच्या नावावर केल्याचे त्याला कळते. इथूनच सुरुवात होते ती अक्षयच्या विनोदी संघर्षाला. यात तमन्ना भाटीयाने त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे.
‘इट्स एन्टरटेन्मेंट’मध्ये मिथुन चक्रवर्ती, प्रकाश राज, सोनू सूद, जॉनी लिव्हर, कृष्णा अभिषेक आणि हितेन तेजवानी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ८ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader