तमिळ सुपरस्टार रजनीकांत ‘कोचादैयान’ या चित्रपटाद्वारे पुन्हा रुपेरी पडद्यावर परतत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांतची मुलगी सौंदर्या आर अश्विन हिने केले आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि फिल्म-मेकिंग व्हिडिओ नुकताच चेन्नईमध्ये दाखवण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान सुपरस्टार शाहरुख खानसहीत अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते.
या ट्रेलरद्वारे पहिल्यांदाच दीपिका पदुकोणच्या राजकुमारी वधना या भूमिकेची झलक पाहावयास मिळते. कोचादैयान एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहता रजनीकांतच्या इतर चित्रपटांप्रमाणेच हादेखील रजनी स्टायल अॅक्शनपट असणार असल्याची कळते. रजनीकांतने यात दुहेरी भूमिका निभावली आहे. ‘कोचादैयान’ हा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार पहिलाच चित्रपट आहे.
पाहाः ‘कोचादैयान’मध्ये दीपिका आणि रजनीकांतचा रोमान्स
तमिळ सुपरस्टार रजनीकांत 'कोचादैयान' या चित्रपटाद्वारे पुन्हा रुपेरी पडद्यावर परतत आहे.
First published on: 11-03-2014 at 11:11 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch trailer deepika padukone romances rajinikanth in kochadaiiyaan