अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीची प्रमुख भूमिका असणारा बहुचर्चित ‘मांझी- द माऊंटन मॅन’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील दशरथ मांझींच्या भूमिकेतील नवाझुद्दीन सिद्दीकी प्रेक्षकांवर चांगलाच प्रभाव पाडून जातो. याशिवाय, दशरथ मांझीच्या बायकोची भूमिका साकारणाऱ्या राधिका आपटेनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.  आपल्या खेड्यातील लोकांना दळणवळणाचा सोपा मार्ग मिळावा यासाठी दशरथ मांझीने एकट्याने १९६० ते १९८२ या २२ वर्षाच्या कालावधीत डोंगर पोखरून ३० फुट रुंदीचा ३६० फुटाचा रस्ता तयार केला होता. त्यामुळे त्यांची ‘माऊंटन मॅन’ अशी ओळख निर्माण झाली होती. आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमधून नवाझुद्दीन सिद्दीकीचा दर्जेदार अभिनय प्रेक्षकांनी पाहिला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना येत्या २१ ऑगस्टला प्रदर्शित होत असलेल्या ‘मांझी- द माऊंटन मॅन’ची उत्सुकता आहे.

Story img Loader