अनुराग कश्यपच्या रोमांचकारी आणि भावनिक नाट्यमय ‘अग्ली’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शत झाला आहे.
चित्रपटातील ‘कली’ नावाची मुलगी हरवल्यानंतर घडणा-या घटनांवर ‘अग्ली’ची कथा आधारित आहे. चित्रपटात रोनित रॉय, तेजस्वीनी कोल्हापुरे, राहुल भट्ट, विनीत सिंग, गिरीश कुलकर्णी, सिद्धार्थ कपूर आणि सुवरीन चावला यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटास ‘कान चित्रपट महोत्सवात’ही चांगली प्रशंसा मिळाली होती.
फॅन्टम फिल्म्सची निर्मिती असलेला ‘अग्ली’ ११ ऑक्टोबरला प्रदर्शत होणार आहे.

Story img Loader