प्रतिभावान चित्रपटकर्ता नागेश कुकनूरला ‘इक्बाल’ आणि ‘दोर’या चित्रपटांसाठी ओळखले जाते. त्याच्या आगामी ‘लक्ष्मी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात समाजातील मानवी व्यापार आणि बाल वेश्यांचे विदारक सत्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सत्यघटनेवर आधारित या चित्रपटात लक्ष्मी नावाच्या पौगंडावस्थेतील मुलीची कथा सांगण्यात आली आहे. या मुलीचे अपहरण करून, तिला भयानक कृत्ये करण्यास जबरदस्ती केली जाते. या सर्व प्रकारामुळे ती पार खचून जाते. या दलदलीतच तिचे एका सक्षम स्त्रीमध्ये रूपांतर होते आणि कालांतराने तिला न्याय मिळतो.
चित्रपटाचा हा ट्रेलर हृदय पिळवटून टाकणारा आहे, ज्यातून वास्तवतेचे खरे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
गायक मोनाली ठाकूर चित्रपटात प्रमूख भूमिकेत आहे. मोनालीने ‘रेस’ चित्रपटातील ‘जरा जरा टच मी..’ हे गाणे गायले आहे.
या चित्रपटात अभिनेत्री शोफाली शहा, राम कपूर आणि स्वत: नागेश कुकनूर (दलालाच्या भूमिकेत) सुद्धा दिसणार आहेत. ब-याच काळापासून प्रतिक्षेत असलेला हा चित्रपट जानेवारी २०१४ मध्ये चित्रपटगृहात दाखल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा