बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या ‘बुलेट राजा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सैफ अली खानने चित्रपटात राजा मिश्राची भूमिका साकारली आहे. त्याची ही भूमिका ‘ओमकारा’मधील लंगडा त्यागीची आठवण करून देते. तसेच, ट्रेलरमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि सैफचा रोमान्सही दाखविण्यात आला आहे.
सैफ, सोनाक्षीसोबत जिमी शेरगिल आणि दाक्षिणात्य अभिनेता विद्युत जामवाल यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सैफला गुन्ह्यांमध्ये साथ देणा-या मित्राची भूमिका जिमी शेरगिलने केली असून विद्युत पोलिसाच्या भूमिकेत आहे. विद्युतने साकारलेल्या भूमिकेसाठी आधी इरफान खानला विचारण्यात आले होते. अॅक्शनपट असलेला ‘बुलेट राजा’ २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
पहाः ‘बुलेट राजा’ चित्रपटाचा ट्रेलर
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या 'बुलेट राजा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
First published on: 30-09-2013 at 06:00 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch trailer saif ali khans rustic avatar in bullett raja