बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या ‘बुलेट राजा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सैफ अली खानने चित्रपटात राजा मिश्राची भूमिका साकारली आहे. त्याची ही भूमिका ‘ओमकारा’मधील लंगडा त्यागीची आठवण करून देते. तसेच, ट्रेलरमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि सैफचा रोमान्सही दाखविण्यात आला आहे.
सैफ, सोनाक्षीसोबत जिमी शेरगिल आणि दाक्षिणात्य अभिनेता विद्युत जामवाल यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सैफला गुन्ह्यांमध्ये साथ देणा-या मित्राची भूमिका जिमी शेरगिलने केली असून विद्युत पोलिसाच्या भूमिकेत आहे. विद्युतने साकारलेल्या भूमिकेसाठी आधी इरफान खानला विचारण्यात आले होते. अॅक्शनपट असलेला ‘बुलेट राजा’ २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा