काही दिवसांपासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूरचे ‘एक व्हिलन’ या चित्रपटाचे उत्कट असे सिनेपोस्टर सर्वत्र झळकत आहे. मोहित सुरीच्या या चित्रपटाचा आता पहिला ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला आहे, जो पोस्टरच्या एकदम विपरीत आहे.
ट्रेलरची सुरूवात सिद्धार्थ आणि श्रद्धाच्या गोव्यामधील रोमान्सने होते. गोव्यात ते बाईक राईडचा आनंद घेताना आपल्या दृष्टीस पडतात. काहीच वेळात मुखवटा परिधान केलेला सिद्धार्थ एका खलनायकी रूपात आपल्या समोर येतो. प्रथम एका प्रियकरच्या भूमिकेत दिसणारा सिद्धार्थ थोड्याच वेळात स्त्रियांचे आणि पुरूषांचे खून पाडत शहरभर फिरताना आपल्याला पाहायला मिळतो.
ट्रेलरमधील भावनिक, थरारक आणि मारधाडीचे प्रसंग चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढविण्यात यशस्वी ठरतील. या चित्रपटाद्वारे श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ गुरु नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या आधी ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ आणि ‘हसी तो फसी’ चित्रपटांमध्ये लव्हर बॉयच्या भूमिकेत दिसलेला सिद्धार्थ ‘एक व्हिलन’ या चित्रपटात वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरदरम्यान स्क्रिनवर रितेश देशमुखची झलक पाहायला मिळते, जो या चित्रपटात राकेशची व्यक्तिरेखा साकारत आहे. एकता कपूर आणि तिची आई शोभा यांची निर्मिती असलेला ‘एक व्हिलन’ हा चित्रपट २७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा