सोनम कपूर आणि आयुषमान खुरानाच्या ‘बेवकुफियाँ’ चित्रपटाचे अधिकृत ट्रेलर एकदाचे प्रसिद्ध झाले असून, यात पिंक रंगाच्या स्टिमी हॉट बिकनीतील ही रांझना गर्ल सुपर हॉट दिसते. स्विमिंगपूलमधील आयुषमानबरोबरच्या एका दृष्यात पिंक रंगाची टु पीस बिकनी परिधान केलेली आकर्षक रूपातली सोनम आपल्या समोर येते. यश राज प्रॉडक्शनचा बेवकुफियाँ हा चित्रपट एक सुस्थापित एक्झिक्युटिव्ह आणि त्याची गर्लफ्रेण्ड यांची कथा आहे. चित्रपटात आयुषमानने या युवकाची, तर सोनम कपूरने त्याच्या गर्लफ्रेण्डची भूमिका साकारली आहे. जोपर्यंत मुलगा मुलीच्या वडिलांना भेटत नाही, तोपर्यंत त्यांचे आयुष्य मजेत चालले असते. मुलीच्या वडिलांची भूमिका ऋषी कपूर यांनी साकारली आहे. अशा प्रकारच्या अन्य कोणत्याही चित्रपटात बॉयफ्रेण्ड आणि मुलीच्या वडिलांमध्ये दाखवली जाणारी टशन यात देखील दिसत असली, तरी ऋषी कपूर मुलीच्या वडिलांची भूमिका साकारत असल्याने चित्रपटात अधिक नाट्यमयता आणि रंजकता अनुभवायला मिळण्याची आशा ठेवायला काहीच हरकत नाही. सोनम आणि आयुषमान पहिल्यांदाच एकत्र काम करीत असून, त्यांच्यातली केमेस्ट्री चांगल्या प्रकारे जमून आलेली दिसते. नुपुर अस्थानाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा हबिब फैझल याने लिहिली आहे. १४ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

येथे पाहा ‘बेवकुफियाँ’चे पहिले ट्रेलर –

Story img Loader