बॉलीवूड दिवा सोनम कपूर आगामी ‘खुबसूरत’ चित्रपटातून आपल्या चुलबुल्या अंदाजाने चाहत्यांवर छाप पाडण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती डिस्नी आणि अनिल कपूरने केली आहे.
रेखा यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या ‘खुबसूरत’ (१९८०) या चित्रपटाचा हा रिमेक आहे. चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरलमध्ये प्रसोनजीत चॅटर्जी यांना ठीक करण्यासाठी आलेल्या फिजिओथेरपिस्टच्या भूमिकेत सोनम दिसते. अशोक कुमार यांनी मूळ चित्रपटात साकारलेली भूमिका प्रसोनजीत यांनी केली आहे. दीना पाठक यांचे वर्चस्व असलेल्या बहिणीच्या कुटुंबात रेखा या वेगळ्या असतात, त्याचप्रमाणे या चित्रपटात राजेशाही कुटुंबात डॉक्टर म्हणून गेलेली चुलबुली सोनम ही वेगळी, हटके वाटते. चित्रपटाच्या कथेत फारसा बदल करण्यात आलेला नाही. केवळ यात सोनम कपूर ही स्टाइलिश अंदाजात दिसते. फवाद अफझल आणि आदिती राव हैद्री यांच्याही चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. ‘खुबसूरत’चा रिमेक असेलला हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा