बॉलीवूडमध्ये ‘स्टुड्न्ट ऑफ द इयर’ या यशस्वी चित्रपटाने पदार्पण करणारी जोडी आलिया भट आणि वरुण धवन आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटातून ही जोडी पुन्हा एकदा आपली जादू चालविणार आहे.
ट्रेलरची सुरुवात ताकदवान पंजाबी मुलगा हम्प्टीच्या स्वप्नाने होते. स्वप्नात तो काव्याला (आलिया) पाहत असतो आणि पाठीमागे ‘मुड मुड के ना देख.. ‘हे गाणे सुरु असते. चित्रपटात वरूणने लग्नासाठी मुलगी शोधत असलेल्या साध्या मुलाची भूमिका साकारली आहे. तर दुसरीकडे आलिया एका बिनधास्त तरुणीच्या लूकमध्ये दिसते. ती आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगते असते. यातील मनोरंजक गोष्ट म्हणजे आलिया यात करिनाची चाहती दाखविण्यात आली आहे. ट्रेलरच्या शेवटी वरुण डोळ्यात  पाणी आणून करण जोहरचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाचा एक सीन बघत आहे.
करण जोहर निर्मित ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ ११ जुलैला प्रदर्शित होणार आहे.