बॉलिवूड स्टार ते चित्रपट निर्माती असा प्रवास केलेल्या शिल्पा शेट्टीची निर्मिती असलेला ‘ढिश्क्यांव’ चित्रपटामध्ये बॉलिवूडचा अॅग्री मॅन सनी देओल आणि मॉडेल-अभिनेता हर्मन बावेजा वेगळ्या अवतारांमध्ये दिसणार आहेत.  
‘ढिश्क्यांव’ चित्रपटाचा पहिला प्रभावशाली ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. बॉलिवूडमध्ये काहीसा अपयशी ठरलेला हर्मन बावेजा ‘ढिश्क्यांव’ चित्रपटामधून कमबॅक करत आहे.    
गुन्हेगारी जगतामध्ये काहीतरी मोठ करण्याचे ठरवलेल्या दोन छोट्या व्यक्तींवर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा विक्की काडतूस (हर्मन बावेजा) आणि लकवा(सनी देओल) यांच्या भोवती फिरते.   
पडद्यावर रागिट दिसणारा सनी देओल ‘ढिश्क्यांव’मध्ये हरियाणवी ठेक्यात बोलत सर्वांना आश्चर्याचा धक्का देणार आहे.   
‘ढिश्क्यांव’ चित्रपटामध्ये आदित्य पांचोली, प्रशांत नारायणन आणि आयेशा खन्ना यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. मात्र, सनीच्या चाहत्यांना २८ मार्च पर्यंत ‘ढिश्क्यांव’च्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे.
‘ढिश्क्यांव’चा ट्रेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा