सुशांत सिंग राजपूतच्या वाढदिवशी ‘डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी’ या त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला. दिवाकर बॅनर्जीच्या या चित्रपटात कोलकातामधील १९४३चा काळ दर्शविण्यात आला आहे. चित्रपटात सुशात सिंग राजपूत डिटेक्टिव्ह व्योमकेशच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुशांतला डिटेक्टिव्ह व्योमकेशच्या व्यक्तिमत्वाचा सूर चांगलाच गवसल्याचे चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर जाणवते. हा चित्रपट सुशांतच्या चित्रपट कारकीर्दीतला मैलाचा दगड ठरू शकतो. ३ एप्रिलला ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तोपर्यंत हा चित्रपटाचा ट्रेलर खास सुशांतच्या चाहत्यांसाठी येथे देत आहोत.

Story img Loader