वरुण धवनच्या रुपाने बॉलिवूडला नव्या युगाचा गोविंदा मिळाल्यासारखे दिसते. वडील डेव्हिड धवन यांच्या ‘मैं तेरा हिरो’ चित्रपटात दिसणाऱ्या वरुणला पाहिल्यावर तुम्हाला त्याच्या वडिलांचा फेव्हरिट अभिनेता गोविंदाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. डेव्हिड धवन यांच्या अन्य चित्रपटांप्रमाणेच बॉलिवूड चित्रपटासाठी आवश्यक असलेला मसाला यात ठासून भरलेला आहे. रोमान्सपासून कॉमेडीपर्यंत आणि खुसखुशीत संवादांपासून हाणामारीपर्यंत यात सर्व काही आहे. एलेना डिक्रुझ आणि नर्गिस फाखरी बॉलिवूडच्या या दोन सुंदऱ्याबरोबर वरुण रोमान्स करताना दिसणार आहेत. या चित्रपटात तो एका सामान्य कुटुंबातील महाविद्यालयीन विद्यार्थ्याची भूमिका साकारत असून, चित्रपटातील हाणामारीची दृष्ये साकारण्यासाठी त्याने खास ट्रेनिंग घेतले आहे. आलिशान सेट, खुसखुशीत संवाद आणि आनंदी वातावरण दाखविण्यात आलेला हा चित्रपट डेव्हिड धवन यांच्या नेहमीच्याच शैलीतला आहे. एकता कपूरच्या ‘बालाजी प्रॉडक्शन’ बॅनरखाली बनलेला हा चित्रपट ४ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाहा : ‘मैं तेरा हिरो’ चित्रपटाचा ट्रेलर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch trailer varun dhawan new age govinda in main tera hero