बॉलीवूडचा नवा रॉकस्टार वरूण धवन आणि इलियाना डिक्रुझ यांच्या ‘मै तेरा हिरो’ चित्रपटातील ‘बेशरमी की हाइट’ गाणे प्रदर्शित झाले आहे.
‘बेशरमी की हाइट’ हे एक पार्टी साँग आहे. गाण्याचे संगीत, इफेक्टस, वातावरण आणि त्यातले लूक लगेचच डिस्कोची आठवण करून देतात. या गाण्यास संगीत साजिद-वाजीदने दिले असून, त्यांनी ते गायलेदेखील आहे. वरूण आणि इलियानाचे डान्स मूव्हस् प्रेक्षकांनाही गाण्यावर थिरकण्यास भाग पाडणारे आहेत. डेव्हिड धवन यांच्या अन्य चित्रपटांप्रमाणेच बॉलिवूड चित्रपटासाठी आवश्यक असलेला मसाला यात ठासून भरलेला आहे. रोमान्सपासून कॉमेडीपर्यंत आणि खुसखुशीत संवादांपासून हाणामारीपर्यंत यात सर्व काही आहे. एलेना डिक्रुझ आणि नर्गिस फाखरी बॉलिवूडच्या या दोन सुंदऱ्याबरोबर वरुण रोमान्स करताना दिसणार आहेत. आलिशान सेट, खुसखुशीत संवाद आणि आनंदी वातावरण दाखविण्यात आलेला हा चित्रपट डेव्हिड धवन यांच्या नेहमीच्याच शैलीतला आहे. एकता कपूरच्या ‘बालाजी प्रॉडक्शन’ बॅनरखाली बनलेला हा चित्रपट ४ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2014 रोजी प्रकाशित
पाहाः वरूण, इलियाना आणि ‘बेशरमी की हाइट’
बॉलीवूडचा नवा रॉकस्टार वरूण धवन आणि इलियाना डिक्रुझ यांच्या मै तेरा हिरो चित्रपटातील बेशरमी की हाइट गाणे प्रदर्शित झाले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 21-02-2014 at 04:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch varun ileana and besharmi ki height