‘बॉबी जासूस’ या चित्रपटात विद्या बालन साकारत असलेल्या व्यक्तीरेखांच्या लूक्सवर खूप मेहनत घेण्यात आल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, बॉलीवूडमधल्या अनेकांना  विद्या बालनला चित्रपटातील व्यक्तीरेखांमध्ये पाहिल्यावर आश्चर्याचा जोरदार धक्काच बसला. आपले सोंग नक्की कितपत वठले आहे, याचा अंदाज घेण्यासाठी विद्या बालन बॉबी जासूसमधील भिकाऱ्याच्या वेषात बॉलीवूड सेलिब्रिटींच्या सेटवर गेली आणि त्यानंतर प्रत्येकालाच आश्चर्यचकित होण्याची वेळ आली. ह्रतिक रोशन, सोहेल खान आणि अरबाझ खान यांच्या चित्रीकरणाच्या सेटवर विद्या भिकाऱ्याच्या वेषात हजर झाली आणि एकच धम्माल उडाली. ह्रतिक रोशन चित्रीकरणात व्यग्र असताना, भिकाऱ्याच्या वेषातील विद्या चित्रीकरणात अनेक अडथळे आणत होती. वारंवार येत असलेल्या अडथळ्यांनी ह्रतिक रोशन संतापला. ह्रतिकची ही अवस्था पाहून चित्रीकरणाच्या सेटवर अनेकांना हसू आवरत नव्हते.

 

Story img Loader