‘प्यार के साइड इफेक्टस्’ चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ‘शादी के साइड इफेक्टस्’चा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २००६ साली प्रदर्शित झालेल्या प्यार के साइड इफेक्टसमध्ये राहुल बोस आणि मल्लिका शेरावतने प्रमुख भूमिका केली होती. त्यांनी त्यात साकारलेली सिड आणि त्रिशाची भूमिका आता सिक्वलमध्ये फरहान अख्तर आणि विद्या बालन यांनी केली आहे.
लग्नानंतर येणा-या अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी फरहान नवनवे उपाय योजताना दिसतो. दुसरीकडे, मुलीबाबत काळजीपूर्वक वागणा-या आईची भूमिका विद्याने केली आहे. सिडला (फरहान) ती प्रत्येक गोष्टीत टोकताना यात दिसते. जोरात घोरू नकोस, मिली (त्यांची मुलगी) उठेल अशा त-हेने ती मुलीची काळजी करताना दिसते. राम कपूरने फरहानच्या मित्राची भूमिका केली आहे. जो सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याचे सल्ले तो सिडला देत असतो. हा चित्रपट पुढील वर्षी फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा