अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिचा आगामी चित्रपट ‘चेन्नई एक्स्प्रेस’चे शुटिंग चित्रपटाचे दिग्दर्शक रोहीत शेट्टी आणि अभिनेता शाहरुख खान सोबत पुर्ण केले. यानंतर शुटिंग सेट वरच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ दीपिकाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आणि त्याबरोबर ‘Expressing love on the last day’ (Rohit Shetty ‘Shtyle’) असे लिहीले आहे.
या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक रोहीत शेट्टी आणि अभिनेता शाहरुख खान दिपिकाला ठोसा कसा मारायचा याचे धडे देत होते. सरतेशेवटी दिपिकाही अभिनेता शाहरुख खान ला जोरदार ठोसा मारते त्याचबरोबर दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या डोक्यावर काचेची बाटली फोडतानाही चित्रित करण्यात आले आहे. अर्थात यात चित्रिकरणाच्या तांत्रिक बाबींचा वापर करण्यात आला आहे. अगदी रोहीत शेट्टी स्टाईलने.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch why did deepika padukone punch shah rukh khan