‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘होणार सून मी या घरची’ मध्ये ‘काहीही हा श्री..’ ने संपणाऱया जान्हवीच्या चपखल संवादाची व्हॉट्सअॅपवर गेल्या काही दिवसांपासून खिल्ली उडवली जात आहे. काहीही हा श्री…या संवादाने संपणारे असंख्य विनोद सध्या व्हॉट्सअॅप फिरू लागलेत. सोशल मीडियासारख्या सजग माध्यमांत तितकेच सजग आणि हजरजबाबी नेटकर कोणाची केव्हा खिल्ली उडवतील याचा काही नेम नाही. आलोकनाथ, रजनीकांत, आलिया भट यांच्यानंतर आता टेलिव्हिजन कलाकार तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर नेटकरांच्या कचाट्यात सापडले आहेत. जान्हवीचा ‘काहीही हा श्री…’ हा संवाद घेऊन वेगवेगळे विनोद सध्या व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत. त्यात भर म्हणून की काय, ‘श्री’ हे यमक साधण्यासाठी श्रीलंका, श्रीनिवासन, श्रीकृष्ण, श्रीदेवी अशा वेगवेगळ्या व्यक्ती आणि घटकांना घेऊन ‘काहीही हां श्री..’ असे विनोद केले जात आहेत.

व्हॉट्सअॅपवर फिरणारे विनोद-

What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Aishwarya Narkar
“ही विकृती…”, सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “मी ब्लॉक केलं म्हणून तो माणूस…”
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackray?
Devendra Fadnavis : “चंद्रपूरचे आपण सगळेच वाली! कुणीही सुग्रीव नाही, मी कुणासारखा जोक…”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला?
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
What Rajiv Kumar Said?
Rajiv Kumar : राजीव कुमार यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका, “हेलिकॉप्टर तपासलं गेल्यावर काहींनी घाणेरडी भाषा..”

जान्हवी: श्री मला अंडी खावीशी वाटतायंत.
श्री: थांब थोडा वेळ लोक टीव्हीवर फेकून मारतीलच आता.
जान्हवी: काहीही हां श्री..
———————-
श्रीशांत (कोर्टात): मी दोषी नाही. माझा मॅच फिक्सिंगशी संबंध नाही.
न्यायाधीश: काहीही हां श्री..
———————-
श्रीनिवासन: बीसीसीआयमध्ये माझ्या इतका दबदबा कोणाचाच नाही.
शरद पवार: काहीही हा श्री..
———————
श्रीदेवी: काटे नही कटते दिन ये रात..केहेनी थी जो तुमसे दिल की बात..लो आज मैं केहेती हूँ..I LOVE YOU
अनिल कपूर: काहीही हां श्री..
———————
हनुमान: मी एका हाताने पर्वत उचलला.
श्रीकृष्ण: मी करंगळीवर पर्वत उचलला.
हनुमान: काहीही हां श्री..
——————–
श्रीलंका: मी सर्व देशात सुंदर आहे.
भारत: काहीही हां श्री..
——————–
श्रीखंड: तुझा सिझन संपला आता परत माझा सिझन
आम्रखंड: काहीही हां श्री..
——————–

Story img Loader