‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘होणार सून मी या घरची’ मध्ये ‘काहीही हा श्री..’ ने संपणाऱया जान्हवीच्या चपखल संवादाची व्हॉट्सअॅपवर गेल्या काही दिवसांपासून खिल्ली उडवली जात आहे. काहीही हा श्री…या संवादाने संपणारे असंख्य विनोद सध्या व्हॉट्सअॅप फिरू लागलेत. सोशल मीडियासारख्या सजग माध्यमांत तितकेच सजग आणि हजरजबाबी नेटकर कोणाची केव्हा खिल्ली उडवतील याचा काही नेम नाही. आलोकनाथ, रजनीकांत, आलिया भट यांच्यानंतर आता टेलिव्हिजन कलाकार तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर नेटकरांच्या कचाट्यात सापडले आहेत. जान्हवीचा ‘काहीही हा श्री…’ हा संवाद घेऊन वेगवेगळे विनोद सध्या व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत. त्यात भर म्हणून की काय, ‘श्री’ हे यमक साधण्यासाठी श्रीलंका, श्रीनिवासन, श्रीकृष्ण, श्रीदेवी अशा वेगवेगळ्या व्यक्ती आणि घटकांना घेऊन ‘काहीही हां श्री..’ असे विनोद केले जात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा