बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. सोनम कपूरने शनिवारी २० ऑगस्ट २०२२ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. एक पोस्ट शेअर करत सोनम कपूरने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. सोनम कपूरच्या या गुडन्यूजमुळे कपूर कुटुंबाच्या घरात मोठा आनंद पाहायला मिळत आहे. याच निमित्ताने अभिनेते अनिल कपूर यांनी त्यांच्या नातवासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
सोनम कपूर ही बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांची लेक आहे. सोनम कपूरने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांना आजोबा झाल्याचा प्रचंड आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे.
“मला तो माझ्या भावाप्रमाणे वाटला होता पण…”; ‘अशी’ होती सोनम कपूर-आनंद आहुजाची पहिली भेट
ही पोस्ट शेअर करताना अनिल कपूर म्हणाले, “२० ऑगस्ट २०२२ रोजी, आमच्या कुटुंबातील एका नवीन सदस्याच्या आगमनाची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सोनम आणि आनंद यांना एक निरोगी मुलगा झाला आहे आणि आम्हाला याचा फार आनंद आहे.”
“या गुडन्यूजमुळे आमचे हृदय अभिमानाने भरून गेले आहे. तसेच नवीन पालक बनलेल्या आणि त्यांच्या सुंदर बाळाला खूप खूप प्रेम”, असे अनिल कपूर म्हणाले. त्यासोबत अनिल कपूर यांनी आनंद अहुजा आणि कपूर कुटुंबातील सदस्यांची नावेही यात लिहिली आहेत.
Sonam Kapoor Pregnancy : सोनम कपूरने दिला बाळाला जन्म? जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या फोटोमागील सत्य
ही पोस्ट शेअर करताना अनिल कपूर यांनी काहीही कॅप्शन दिलेले नाही. त्यांनी फक्त काळ्या रंगाचा हार्ट इमोजी कॅप्शनमध्ये पोस्ट केला आहे. त्यांच्या या पोस्टमध्ये एक प्रसिद्ध इंग्रजी गाणेही वाजताना दिसत आहे. सोनम कपूरची लहान बहिण रिया कपूर हिने देखील इन्स्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान सोनम कपूरने २०१८ मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर चार वर्षांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला होता. त्याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.