बॉलिवूड अभिनेता सलमान खानला शनिवारी रात्री त्याच्या पनवेल फार्म हाऊसवर सर्पदंश झाल्याची घटना घडली. ही बातमी समजताच सलमानचे संपूर्ण कुटुंब त्याला भेटण्यासाठी पनवेलच्या फार्महाऊसवर दाखल झाले. दरम्यान सलमानला चावणारा साप विषारी नव्हता. त्यामुळे रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले. त्यानंतर सलमान त्याच्या फार्म हाऊसवर आराम करताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर सलमान खानचे वडील सलीम खान यांनी ई टाईम्सशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, जेव्हा सलमानला जवळच्या रुग्णालयात इंजेक्शन देण्यासाठी नेण्यात आले तेव्हा निश्चित आम्ही सर्वजण काळजीत होतो. पण सुदैवाने तो साप विषारी नसल्याचे निष्पन्न झाल्याने सुटकेचा निश्वास सोडला.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर सलमान त्याच्या फार्म हाऊसवर परत आला. त्यानंतर त्याने काही तास विश्रांती घेतली. पण आता तो ठीक आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही. पण ही बातमी ऐकल्यानंतर निश्चितच मी घाबरलो होतो, असेही सलीम खान यांनी सांगितले.

अभिनेता सलमान खानला सर्पदंश, पनवेलच्या फॉर्महाऊसवर घडली घटना

दरम्यान सलमानच्या पनवेलच्या फार्म हाऊसवरील अनेक कर्मचाऱ्यांना यापूर्वी साप आणि विंचू चावले आहेत. पण त्यांना काहीही इजा झालेली नाही. विशेष म्हणजे फार्म हाऊसच्या आजूबाजूच्या जंगलातील बहुतेक साप हे विषारी नसतात. त्यामुळे जेव्हा सलमानला साप चावला, तेव्हा आमच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. विषारी नसलेल्या सापांना मारू नये, असे आम्ही त्यांना सांगितले आहे. त्यामुळे सलमानला चावणारा साप विषारी नाही हे कळल्यावर आम्ही त्याला पुन्हा जंगलात सोडले. त्याला फार्म हाऊसपासून थोड्या अंतरावर असणाऱ्या जंगलात सोडण्यात आले आहे, असे देखील सलीम खान यांनी स्पष्ट केले.

“साप चावल्यानंतर असं हसणं…”; वाढदिवशी माध्यमांसमोर आल्यानंतर सलमान खानची प्रतिक्रिया

दरम्यान, शनिवारी रात्री अभिनेता सलमान खानला सापाने दंश केला होता. सलमान खान त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर उपस्थित होता. ख्रिसमस साजरा करण्यासाठी तो फार्महाऊसवर आला असताना त्याच्यासोबत हा अपघात झाला. यानंतर रात्री उशिरा सलमान खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला.

Story img Loader