‘कोणी ठरवून प्रेमात नाही पडत, ते सहज घडते, आपल्याला विरघळून जायला होते. अगदी प्रेमाचा विचार केला तरीही आपल्या चेहऱ्यावर हसू उमटते,’ ही प्रेमळ भावना व्यक्त केली आहे अभिनेत्री मुक्ता बर्वे हीने. सध्या डबल सीट या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत असलेली अभिनेत्री मुक्ता बर्वे तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीत व्यस्त आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई पुणे मुंबई २’ मध्ये ती स्वप्नील जोशीसोबत पुन्हा एकदा झळकणार आहे. नुकताचं चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉन्च करण्यात आला त्यावेळी मुक्ता बोलत होती.
अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणाली, “आपण प्रत्येकजण कोणत्या न कोणत्या क्षणी कुणाच्या तरी प्रेमात पडतो… सुरुवातीला आपल्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रेम सुंदर भासू लागते. कोणी ठरवून प्रेमात नाही पडत, ते सहज घडते, आपल्याला विरघळून जायला होते. अगदी प्रेमाचा विचार केला तरीही आपल्या चेहऱ्यावर हसू उमटते. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा माझ्याकरिता एक असाच महत्त्वाचा, न संपणारा, सुंदर आणि मोलाचा अनुभव होता. जेव्हा मला सतीशने पटकथा ऐकवली तत्क्षणी मी मुंबई पुणे मुंबईच्या प्रेमात पडले. ‘मुंबई पुणे मुंबई -२’ लग्नाला यायचंच म्हणजे सतीश, स्वप्नील, सुहास आणि इतरांसोबतचा एक अविस्मरणीय, ऊबदार, अप्रतिम असा प्रवास आहे. ‘मुंबई पुणे मुंबई -२’ लग्नाला यायचंचमधले एखादे दृश्य, गाणं, किंवा छोट्या प्रसंगाची झलक दिसल्यावर माझं काळीज थबकून जाते…अगदी पहिल्यांदा प्रेमात पडल्याप्रमाणेच!
‘मुंबई पुणे मुंबई २’ दिवाळी दरम्यान १२ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शनासाठी सज्ज होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा